स्वामीनाथन आयोग समितीची पार्श्वभूमि - २००२ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत होते. कमी उत्पादकता , कर्जात बुडालेले शेतकरी , आणि ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर या काही प्रमुख समस्या होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी , तत्कालीन सरकारने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाला , भारतीय शेतीचे भविष्य घडवण्यासाठी व्यापक शिफारसी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. प्रमुख शिफारसी: आयोगाने 2006 मध्ये आपला अहवाल सादर केला , ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश होता. त्यापैकी काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे - १) शेतकऱ्यांसाठी हमी भाव ( MSP) - हमी भाव ( MSP) हा भारतीय सरकारकडून निश्चित केलेला किमान किंमत आहे ज्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे पीक खरेदी केले जाईल. स्वामीनाथन आयोग यांनी MSP मध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले , ज्याचा शेतकऱ्यांव...
शेती, समाज, राजकारण, पर्यावरण आणि आरोग्य या विषयांवर आधारित मराठीतील विचार आणि माहितीचा खजिना.