शाश्वत शेती आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते . या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत - शाश्वत शेती म्हणजे काय ? शाश्वत शेतीचे प्रकार भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ? शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय 1. शाश्वत शेती म्हणजे काय ? शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते....
शेती, समाज, राजकारण, पर्यावरण आणि आरोग्य या विषयांवर आधारित मराठीतील विचार आणि माहितीचा खजिना.