Skip to main content

शाश्वत शेती: पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी टिकाऊ मार्ग

      
शाश्वत शेती
शाश्वत शेती

  आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते.

या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत - 
  1. शाश्वत शेती म्हणजे काय ? 
  2. शाश्वत शेतीचे प्रकार 
  3. भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ?
  4. शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी 
  5. शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय 
1. शाश्वत शेती म्हणजे काय ? 

          शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते. 

शाश्वत शेतीमधील काही मुख्य मुद्दे - 
         
           शाश्वत शेती ही एक अशी कृषी पध्दती आहे जी पर्यावरण, सामाजिक, आणि आर्थिक दृष्ट्या टिकावू आहे. याचा अर्थ असा की ती जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते, शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न देते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी विषमुक्त अन्न पुरवठा करण्यासाठी मदत करते.

          पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ - रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, सेंद्रीय खतांचा वापर करणे, जैविक कीटक नियंत्रण पद्धतींचा अवलंब करणे, मातीची धूप थांबवणे, पाण्याचा वापर गरजे पुरता करणे, जैवविविधता टिकवून ठेवणे.

         सामाजिक दृष्ट्या उपयोगी - शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती मालाला योग्य दर मिळतो, ग्रामीण भागातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, लहान व अल्प भुधारक शेतकरी सक्षम होतात.

       आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य - शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थिरता प्रदान करणे, उत्पादन खर्च कमी करणे, बाजारपेठेतील मूल्यात वाढ करणे, मूल्यवर्धित शेती उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे. 

2. शाश्वत शेतीचे प्रकार -  
सेंद्रिय शेती
        
         शाश्वत शेती ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये शेतीच्या अनेक प्रकारांचा आणि पद्धतींचा अवलंब केला गेला आहे. हे सर्व पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या टिकाऊ कृषी पद्धतींचा अवलंब करतात. 

        1. सेंद्रिय शेती - रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे टाळणे, जैविक किटक-नियंत्रण पध्दतींचा वापर करणे, गांडूळ खत, शेणखत, लेंडी खत या प्रकारच्या खतांचा वापर करणे, पिकांची विविधता आणि पीक फेरपालट पद्धतींचा अवलंब करणे. 
       
       2. जैविक शेती पध्दतींचा अवलंब करणे - जीवाश्म इंधनावर अवलंबून न राहता नैसर्गिक प्रक्रियांद्वारे उत्पादन वाढवणे, सेंद्रीय खते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर, पीक आणि पशुधन यांच्यातील एकात्मता, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर. 

       3. संरक्षित शेती - पावसाच्या पाण्यापासून होणारी मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करणे, मल्चिंग, कव्हर क्रॉप्स, आणि शून्य मशागत पध्दतींचा वापर, वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण करणे, मातीतील ओलावा टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या अच्छादनांचा वापर करणे.
    
       4. कृषी वनीकरण - फळझाडे आणि पिके एकत्रित लावणे, झाडांमुळे मिळणारी सावली आणि पोषकद्रव्ये पिकांसाठी फायदेशीर ठरतात, मातीची धूप आणि क्षारपणा टाळण्यास मदत होते आणि जैवविविधता वाढते.

       5. जलसंवर्धन - पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन चा वापर करणे, विहीर आणि कुपनलिकांचे पुनर्भरण करणे, शेततळ्याची बांधणी करणे, पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड आणि लागवड करावी.

शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करताना अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, जसे की : 

  • संबंधित विभागातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती.
  • उपलब्ध संसाधने
  • सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती.
  • बाजारपेठेतील मागणी.
3. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या काही प्रमुख सरकारी योजना - 
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY)
  • परंपरागत कृषी विकास योजना (PKVY)
  • सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान योजना (Micro Irrigation Scheme)
  • राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA)
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
  • राष्ट्रीय फळबाग योजना (NHM) 
  • मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card)
 4. शाश्वत शेतीसमोरील आव्हाने -  
  • ज्ञान आणि जागरुकतेचा आभाव
  • आर्थिक अडचणी
  • तंत्रज्ञानाची कमतरता
  • बाजारपेठेतील मागणीचा अभाव
  • सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव   
 5. शाश्वत शेतीतील संधी  -    
  • सेंद्रिय शेतमालाची वाढती मागणी 
  • सरकारी योजनांचे पाठबळ
  • तंत्रज्ञानातील प्रगती
  • जैवविविधता
  • Climate smart agriculture
 6. शाश्वत शेतीचे अनेक फायदे आहेत ज्यात खलील गोष्टींचा समावेश होतो -
  • पर्यावरणीय फायदे 
  • सामाजिक आणि आर्थिक फायदे 
  • शेतकऱ्यांना हवामान बदलास जुळवून घेण्यास मदत होते.
  • सेंद्रिय उत्पादकता वाढते 
  • दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना मिळते.            
               शाश्वत शेती ही केवळ एक पर्याय नाही तर सध्याच्या काळाची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्न पुरवठा करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आपल्याला भविष्यात याच पद्धतींचा अवलंब करावा लागेल. शाश्वत शेतीचा अवलंब करून आपण एक अधिक टिकाऊ आणि समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो यात किंचित ही शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

ध्यान म्हणजे काय ? (What is Meditation?)

  ध्यान (Meditation)       ध्यान म्हणजे काय? (What is Meditation?)                     ध्यान ही एक मानसिक क्रिया आहे ज्यामध्ये मन शांत आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो. यात श्वासावर, मंत्रावर, किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते. ध्यान हे एक प्राचीन साधन आहे जे शांतता, आत्म-जागरूकता आणि आध्यात्मिक विकासासाठी वापरले जाते.  ध्यानाचा इतिहास (History of Meditation)                     ध्यानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. सिंधु घाटी सभ्यता (Indus Valley Civilization) मध्ये ध्यान करणाऱ्या लोकांच्या मूर्ती सापडल्या आहेत. प्राचीन भारतात, वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यान आणि मनःशांती यांचा उल्लेख आहे.                  बौद्ध धर्माचा उदय ध्यान परंपरेसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. गौतम बुद्ध यांनी ध्यानाद्वारे बोध प्राप्त केला आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना ध्यान शिकवले. बौद्ध धर्मात...

भारतीय हरतिक्रांतीचे जनक - डॉ. एम. एस. स्वामिनाथन

प्रारंभिक परिचय               भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे. शिक्षण             डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली.  हरित क्रांतीची गरज का पडली ?  १). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६...

स्वामीनाथन आयोग: भारतीय शेतीसाठी एक क्रांतिकारी दृष्टीकोन

स्वामीनाथन आयोग समितीची पार्श्वभूमि -                 २००२ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत होते. कमी उत्पादकता , कर्जात बुडालेले शेतकरी , आणि ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर या काही प्रमुख समस्या होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी , तत्कालीन सरकारने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाला ,  भारतीय शेतीचे भविष्य घडवण्यासाठी व्यापक शिफारसी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. प्रमुख शिफारसी:                आयोगाने 2006 मध्ये आपला अहवाल सादर केला , ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश होता. त्यापैकी काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे - १) शेतकऱ्यांसाठी  हमी भाव ( MSP) -     हमी भाव ( MSP) हा भारतीय सरकारकडून निश्चित केलेला किमान किंमत आहे ज्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे पीक खरेदी केले जाईल. स्वामीनाथन आयोग यांनी MSP मध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले , ज्याचा शेतकऱ्यांव...

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

बियाणे राज्यात खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. पाऊस चांगला झाला तर जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. पेरणीकरिता शेतकरी बियाणे व खत खरेदी करीत आहेत. अनेकदा बोगस बियाणे बाजारात येतात व बियाणे उगवत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एमआरपी एवढेच पैसे द्या! पेरणीसाठी लागणारे कृषी साहित्य तसेच अन्य वेळीही दुकानातून कृषी व्यवसायाशी संबंधित साहित्य खरेदी करताना एमआरपी बघणे आवश्यक असते. जेवढी एमआरपी आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्यावी. दुकानदार जाणीवपूर्वक एखाद्या खताचा तुटवडा निर्माण करतात व एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करतात. शेतकऱ्यांनी त्यावेळी संबंधित खताची जास्त गरज असल्याने शेतकरी जास्त पैसे देऊनही खताची खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नयेत परंतु तसे आढळून आल्यास कृषी विभागाकडे त्या दुकानदाराची तक्रार करावी. खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ? बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बि...

कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५

 कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५ iStock Credit: paresh3d कृषी क्षेत्राला विकासाचे पहिले इंजिन म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि इतर योजनांची घोषणा केली. ज्या १०० जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन आहे अश्या जिल्ह्यांतील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हटले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले कि अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासला मदत होईल मात्र प्रत्यक्षात या विकासाच्या इंजिनला निधीची उर्जा मिळालीच नाही. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या व खतांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता या अर्थसंकल्पावरून आपल्या स्पष्ट होताना दिसते आहे. अर्थसंकल्पातील शेतकरी हिताच्या महत्वाच्या १० योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याच्या होतात का नेहमी प्रमाणे या योजनाही पालापाचोळ्या सारख्या हवेत उडून जातात हे पाहण्यासारखे ठरेल. वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही गगनाला भिडत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे मातीमोल ठरत आहे त्याच्या मालाला चांगला भाव भेटत नाही. निर्यात धोरणाचा अभाव...

हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्हाने

हवामान बदल आणि शेती                 हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.                 मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.            या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळ...