एमआरपी एवढेच पैसे द्या! |
खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ?
बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बिल घेणे गरजेचे आहे. अनेक दुकानदार एका कागदावर हिशोब लिहून देतात. मात्र शेतकऱ्यांनी दुकानदाराला पक्के बिल मागायला हवे.
थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून का ठेवावे ?
दुकानातून बियाणे खरेदी केल्यानंतर पिकाच्या कापणी पर्यंत काही बियाणे व बिल सांभाळून ठेवायला हवे, बियाणे पेरल्यानंतर उगवले नाही तर कृषी विभागाकडे तक्रार करताना बिल व बियाणांची आवश्यकता भासू शकते.
बियाणे खरेदीत फसवणूक झाल्यास तक्रार कोठे कराल ?
तक्रारी सादर करताना शेतकऱ्यांनी अर्ज, मूळ देयक, बियाणे, खते व कीटकनाशकाची पिशवी, टॅग, वेष्टन आदी तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव, कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी, त्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष, उपविभागीय कृषि अधिकारी, तर तालुका कृषि अधिकारी, कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी, कृषि अधिकारी, पंचायत समिती हे असतात.
कमी पावसात व कमी ओलाव्यात पेरणी का करू नये ?
शेतकऱ्यांनी खरीप हंगाममध्ये जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस बियाण्याची पेरणी करू नये. जमीनीत ओल ४ ते ६ इंच किंवा १०० मीमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही बियाण्याची पेरणी करू नये, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना पेरणीची घाई काल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेले बियाण्यांचे अंकुरण होणार नाही किंवा अंकुरण होऊन जळण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बियाणे खरेदी करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत -
१). गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे.
२). बनावट बियाणे खरेदी टाळण्यासाठी दुकानदाराकडून पक्की पावती घ्यावी.
३). पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे की पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमूद असावे.
३). खरेदी केलेले बियाणे हंगामासाठी शिफारस केलेले असावे.
४). बियाणे निवड ही जमिनीची ओली पाहून करावी.
५). बियाण्याची पिशवी सिलबंद आहे का नाही याची खात्री करावी.
६). बियाण्याच्या पिशवीला रंगीत टॅग आहेत का हे तपासून पाहावे.
७). बियाणे खरेदी करताना कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रांना प्राधान्य द्यावे जेणेकरून फसवणूक होणार नाही.
Comments
Post a Comment
या वेबसाइटवरील मत हे वैयक्तिक असून यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
या वेबसाइटवरील महितीची सत्यता दुसरीकडून पडताळून पहावी.